Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले

472 0

बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी आंदोलकांकडून वाहनांना आग लागण्यात आलेली आहे तर शहरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले आहेत.

यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला तसेच पार्किंगमध्ये काही मराठा आंदोलकनाकडून आग लावण्यात आली आहे. यामध्ये चार चाकी आणि दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. जर सरकारने यावर लवकर तोडगा काढला नाहीतर मराठा समाजाकडून अजून उद्रेक होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!