Beed News

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण ! आमदाराच्या बंगल्यानंतर नगर परिषदेचं कार्यालय पेटवले

708 0

बीड : राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलनाला (Maratha Reservation) हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सकाळी दगडफेक करण्यात आली होती. प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आता आंदोलकांनी माजलगाव नगर परिषदेचं कार्यालयदेखील पेटवून दिले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बीड मध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयाला आग लावली आहे. या घटनेत मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंचायत समिती कार्यालयातील कागदपत्र देखील जाळली आहेत.शांततेत चाललेल्या आंदोलनानं अचानक हिंसक वळण घेतल्याने संपूर्ण राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!