12 खासदारांसह अनेक उद्योगपती आज बारामतीत ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेणार भेट

258 0

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला विविध पक्षांचे १२ खासदार शनिवारी बारामतीमध्ये दाखल झालेले आहे.

असे सांगितले जात आहे की, हा दौरा वैयक्तिक स्वरुपाचा आहे. परंतु, अचानकपणे बारामतीत दाखल झालेल्या १२ खासदारांमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे.

एकूण १९ लोकांचा हा दौरा आहे. त्यामध्ये १२ खासदार असून उरलेले मोठे उद्योगपती आहेत. असे सांगितले जात आहे की, बारामतीतील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी हे सर्व खासदार आणि उद्योगपती आलेले आहेत. शनिवारी सकाळी बारामती विमानतळावर या पाहुण्याचे आगमन झालेले आहे.

सकाळी विमानतळावर दाखल होताच लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चाॅकलेट कंपनीला भेट दिली. त्यानंतर महिलांनी बांधलेल्या टेक्सटाईल पार्कलादेखील भेट देऊन महिलांशी या पाहुण्यांनी संवाद साधला. त्याचबरोबर शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट दिली.

Share This News
error: Content is protected !!