Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

516 0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

मनोहर जोशी यांना बुधवारी दुपारी प्रकृती अस्वस्थामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मनोहर जोशींची कारकीर्द ?
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांना जोशी सर असंही संबोधलं जातं. मनोहर जोशी यांचं वय 86 वर्षांचं आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचं सरकार जेव्हा 1995 मध्ये आलं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!