Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge : विरोधी पक्षांच्या महाआघाडीचं नाव ठरलं ! INDIA नावानं लढणार, मल्लिकार्जून खरगेंची मोठी घोषणा

949 0

बंगळुरु : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी आज बंगळुरुतील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर एक मोठी घोषणा केली आहे. विरोधी पक्षांची आघाडी आता यापुढे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स (INDIA) या नावाने लढणार आहे, असं मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले आहेत. या अलायन्सची पुढील बैठक मुंबईमध्ये लवकरच पार पडणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव इंडिया असेल. यासंबंधीची 11 सदस्यांची संयोजन समिती मुंबईतील बैठकीत जाहीर करु असेदेखील ते यावेळी म्हणाले.

Offensive Video : अश्लील व्हिडिओमुळे भाजपाच्या ‘या’ नेत्याचं संपलं आहे राजकीय करिअर

आजच्या बैठकीला देशातील 26 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीत आम्ही यापुढं इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स या नावानं लढणार आहोत. याला सर्वांनी मान्यता दिली आहे. लवकरच 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. समन्वय समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा मुंबईत करणार आहोत. प्रचारमोहीमेसाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. याचं काम दिल्लीतून होणार आहे, असे मल्लिकार्जून खरगे पक्षांच्या बैठकीनंतर संबोधित करताना म्हणाले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!