AJIT PAWAR: ‘त्या’ पॅटर्ननुसार मला मुख्यमंत्री करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी

322 0

मुंबई: केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. या मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी लालबागचा राजा दर्शन घेतलं याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन देखील घेतलं.

याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकांना अनुपस्थित असणाऱ्या अजित पवारांनी अमित शहा मुंबईतून निघताना एअरपोर्टवर झालेल्या बैठकीला उपस्थिती लावत अमित शहा यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

विधानसभेनंतर राज्यात बिहार पॅटर्न नसार मला मुख्यमंत्री करावं अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!