श्रीक्षेत्र नारायणपुरचे सद्गुरू नारायण महाराज यांचं निधन

326 0

पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज यांचं सोमवार 9 सप्टेंबर रोजी रात्री सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळानं नारायण महाराज यांचं निधन झालं आहे.

नारायण महाराज हे विविध समाजकार्यात नेहमी अग्रेसर असायचे. सामुदायिक विवाह सोहळ्याला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिलं. गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक शेती आणि श्रमदानाचे उपक्रम राबवले.

नारायण महाराजांनी भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले, त्यापैकीच एक नारायणपूर आहे. नारायण महाराज यांचं अंत्यदर्शन मंगळवारी (10 सप्टेंबर) दुपारी 2 पर्यंत श्री क्षेत्र नारायणपूर येथे घेता येणार आहे. सायंकाळी चारला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

Share This News
error: Content is protected !!