आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर एकेकाळी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार माजीद मेमन यांनी आता मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींमध्ये असे गुण आहेत जे विरोधकांमध्ये नाहीत. जर लोकांची मत जिंकत ते जगातील लोकप्रिय नेते म्हणून पुढे येत असतील तर त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास गुण असतील, असंही मेमन यांनी म्हटलं आहे.