महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

171 0

मुंबई- महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक यांचा यामध्ये समावेश होता.

सध्या मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने जोरदार मोहीम उघडली आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी गेल्या काही दिवसांत दोन पेनड्राइव्ह बॉम्ब फोडून धमाका उडवला. दुसऱ्या पेनड्राइव्हमध्ये तर सध्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिकांनी दाऊशी संबंधित व्यक्ती वक्फ बोर्डवर कशा नेमल्या, त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप आहेत, असे आरोप करून सभागृहात बॉम्ब फोडले.

राज्यातील अतिशय तापलेल्या राजकीय वातावरणावर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज देवेंद्र फडणीस यांचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी गोव्यानंतर आता महाराष्ट्रात जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तसेच भाजपचे नेतेही महाविकास आघाडीवर जोर एक नवा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुण आमदारांनी शरद पवारांची घेतलेली भेट सध्या चर्चेचे कारण ठरलीय.

 

Share This News
error: Content is protected !!