महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

101 0

मुंबई- महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक यांचा यामध्ये समावेश होता.

सध्या मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने जोरदार मोहीम उघडली आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी गेल्या काही दिवसांत दोन पेनड्राइव्ह बॉम्ब फोडून धमाका उडवला. दुसऱ्या पेनड्राइव्हमध्ये तर सध्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिकांनी दाऊशी संबंधित व्यक्ती वक्फ बोर्डवर कशा नेमल्या, त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप आहेत, असे आरोप करून सभागृहात बॉम्ब फोडले.

राज्यातील अतिशय तापलेल्या राजकीय वातावरणावर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज देवेंद्र फडणीस यांचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी गोव्यानंतर आता महाराष्ट्रात जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तसेच भाजपचे नेतेही महाविकास आघाडीवर जोर एक नवा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुण आमदारांनी शरद पवारांची घेतलेली भेट सध्या चर्चेचे कारण ठरलीय.

 

Share This News

Related Post

उध्दव ठाकरेंशी पंगा घेणाऱ्या सुषमा अंधारेंच्या हाती शिवबंधन

Posted by - July 28, 2022 0
पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अडचणीच्या काळात त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे आज शिवबंधन…

“सुडाच्या राजकारणाच्या नाकावर टिच्चून..!” अनिल देशमुख जेलमधून बाहेर आल्यानंतर रोहित पवारांचे ट्विट, वाचा सविस्तर

Posted by - December 28, 2022 0
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातूनअनिल देशमुख तब्बल 13 महिने…
Sharad Pawar in Beed

Sharad Pawar : शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जल्लोषात स्वागत

Posted by - August 17, 2023 0
बीड : शरद पवार (Sharad Pawar) सभेसाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जल्लोषात स्वागत केलं आहे. आजच्या बीडमधल्या…
suicide

CRIME NEWS : प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी… पाहा VIDEO

Posted by - August 19, 2022 0
ठाणे : ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यातील हद्दीत एका तरुणानं राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून या…
gautami patil

Gautami Patil Video : डान्स सुरू असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामधील घटना

Posted by - May 9, 2023 0
संभाजीनगर : डान्सर गौतमी पाटील हिचे नाव सध्या राज्यात तुफान गाजत आहे. तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत तुफान गर्दी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *