uddhav-thackeray-devendra-fadanvis-ajit-pawar-eknath-shinde

Marathwada Political Sunday : मराठवाड्यात आज ‘सभांचा धडाका’ सत्ताधाऱ्यांसह विरोधक साधणार एकमेकांवर निशाणा

628 0

पुणे : आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्ष कामाला लागले (Marathwada Political Sunday) असून, राज्यभरात महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचा आज धडाका पाहायला मिळणार आहे. आज मराठवाड्यात ‘सभांचा धडाका’ पाहायला मिळणार आहे. कारण एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आज सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांची सभा होत आहे. परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहे. तर बीड जिल्ह्यात अजित पवारांची सभा होणार असून, या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी औरंगाबादच्या वैजापूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

अजित पवारांची बीड जिल्ह्यात सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड शहरात पहिल्यांदाच येत असून, बीड शहरांमध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील 24 तासांपासून या ठिकाणी मंडप उभारणी आकर्षक सजावट करणे अशी कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या सभेसाठी साडेसात ते आठ हजार कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सभेच्या निमित्ताने अजित पवार बीडवासियांसाठी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागला आहे.

हिंगोलीत उद्धव ठाकरेंची सभा
उद्धव ठाकरेंची देखील हिंगोलीत सभा होत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा हा जिल्हा असून, उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

परभणीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम
परभणीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी 11.30 वाजता परभणीत दाखल होणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!