मुंबई : अनेक राजकीय उलथापालथीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेले नसल्याने या मंत्रिमंडळात कुणाकुणाला जागा मिळणार याविषयी अनेक चर्चा राजकीय ,अ-राजकीय वर्तुळात सुरूच असतात.
दरम्यान भाजपने एकनाथ शिंदे यांच्या हातात मुख्यमंत्रीपदाची डोर देऊन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. दरम्यान मनसेचे नेते आ. राजू पाटील यांनी सभागृहामध्ये भाजपच्या बाजूने मतदान केले.
त्यामुळे या “मंत्रिमंडळामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार…” अशा जोरदार चर्चा रंगत असताना,राज ठाकरे यांनी त्यांच्या खळखट्याक भाषेत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “ही बातमी धादांत खोटी असून खोडसाळ आहे. कुणीतरी जाणून-बुजून हे वृत्त पसरवून वातावरण निर्मिती करत असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
