Sharad Pawar and Ajit Pawar

Sharad Pawar : ‘अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा यु – टर्न; आता म्हणतात…

713 0

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. यानंतर आता शरद पवार यांनी अवघ्या 4 तासांमध्ये यु – टर्न घेत अजित पवार आमचे नेते आहेत असं मी बोललोच नाही. ही माध्यमांची चूक असल्याचे ते म्हणाले आहेत. अजित पवार यांनी पुन्हा संधी मागू नये, पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं होतं, पुन्हा असं करणार नाही असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

नेमके काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं विधान शरद पवारांनी केलं होतं. काही जणांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं मानण्याचं कारण नाही असं पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही असं सुप्रिया सुळे यांनी काल म्हटलं होतं. त्यावर शरद पवारांना आज बारामतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार हे आमचे नेते आहेतच, मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं नाही असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय खळबळ उडाली होती.

Share This News
error: Content is protected !!