uday samant

निकाल विरोधात गेल्यास शिंदे गटाचा प्लॅन बी रेडी? उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

452 0

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून राज्याचा राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. आज सुप्रीम (Supreme Court) निकाल येणार आहे. काही वेळातच सत्तासंघर्षाचा निकाल हाती येणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही पक्षातील नेत्यांची धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या निकालाच्या अगोदर दोन्ही पक्षांच्या नेत्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यादरम्यान आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठा गौप्स्फोट केला आहे.

काय म्हणाले उदय सामंत?
सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक आमदार आमच्यासोबत असल्याचा गौप्स्फोट त्यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्स्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. तसेच सत्तासंघर्षाचा निकाल आपल्याच बाजूनं लागेल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नरहरी झिरवाळ (Narhari Sitaram Zirwal) यांचे मोठे वक्तव्य
आज सत्तासंघर्षाचा निकाल आहे. आजचा निकाल हा त्या 16 आमदारांना अपात्र ठरवणारा असेल. 16 आमदार अपात्र होतील. एकनाथ शिंदेंचाही (Eknath Shinde) अपात्र आमदारांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सरकार कोसळेल असे नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!