राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) उद्यापासून म्हणजे 3 मार्च पासून सुरू होत असून 23 मार्चपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. कोणत्या मुद्द्यांवरून विधिमंडळात खडाजंगी होऊ शकते पाहुयात…
3 मार्च ते 23 मार्चदरम्यान राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार असून 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणे, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तसेच स्वारगेट प्रकरणावरून विधिमंडळ कामकाज तापण्याची शक्यता आहे. महायुती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे
दरम्यान या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे..
Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!