आज आर्थिक वर्ष 2025- 26 साठीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आज केंद्राचा अर्थसंकल्प (UNION BUDGET 2025) सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (union minister nirmala sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा आज निर्मला सीतारामण यांनी केली. बारा लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. करासाठीची उत्पन्न मर्यादा यंदा वाढवण्यात आली आहे. आता बारा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या वर्गाला कर भरावा लागणार नाही.
नवी कर रचना
4 लाखांपर्यंत 0%
4 लाख ते 8 लाख 5%
8 लाख ते 12 लाख 10%
12 लाख ते 16 लाख : 15 %
16 लाख ते 20 लाख: 20 %
20 लाख ते 24 लाख: 25%
महिला व मुलींकडे विशेष लक्ष
अर्थसंकल्प 2025 मध्ये महिला आणि मुलींच्या योजनांकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. महिलांसाठीच्या योजनांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. निर्मला सीतारामण यांनी ग्रामीण वर्गातील महिलांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी अर्थसहाय्य योजनेद्वारे करण्यात येणार आहे. तसेच मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या प्रवर्गातील महिलांना लाभ देण्यासाठी दहा हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे.