MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI

MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI: महादेव जानकर काँग्रेस सोबत जाणार ? दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट

3271 0

MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे जानकर काँग्रेससोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
(MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI)

महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी मंत्री महादेव जानकर यांची ‘TOP NEWS मराठी’ला ‘EXCLUSIVE’ प्रतिक्रिया

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ३१ मे रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी जानकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणूक काळात जानकर यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचे संकेत दिले होते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चाही झाली होती.

जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली जाणार होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी महायुतीसोबतच कायम राहण्याचा निर्णय घेतला होता.

महादेव जानकर यांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यामुळे ते पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जानकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती दिली.

BREAKING NEWS: निवडणूक जाहीर होताच महायुतीला पहिला झटका; महादेव जानकर महायुतीतून बाहेर 

BHIWANDI NEWS: लटकलेले मृतदेह, सुसाईड नोट आणि उद्ध्वस्त कुटुंब भिवंडीतील आत्महत्या कांड

PAKISTANयुट्युब चॅनल बंद करण्याला बदला म्हणतात का? SANJAY RAUT यांचा सवाल

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा पुतण्या लोकसभेच्या रिंगणात; ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार निवडणूक

HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण

Loksabha Election Result : महाराष्ट्रातील संपूर्ण 48 विजयी उमेदवारांची यादी

ANNA BANSODE VIDHANSABHA VICE SPEAKER | विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे बिनविरोध!; कसा आहे राजकीय प्रवास?

MAHARASHTRA KESARI WINNER 2025 | पैलवान पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

Vidhansabha: ‘या’ आठ आमदारांनी घेतली नाही विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Sneha Dubey: हितेंद्र ठाकूरांची 35 वर्षांची सत्ता उलथवून लावणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत ?

Pune News : रायसोनी कॉलेजच्या प्रा. रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Share This News
error: Content is protected !!