Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

435 0

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. प्रचारसभांमधून नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत दिसत आहेत. यादरम्यान टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. जय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. बळवंत वानखेडे यांच्याविरोधात नाचीची नाही, तर देशाची लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे असंही म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
“ही लढाई देशाची आहे. ही लढाई बळवंत वानखेडे विरोधात नाची अशी नाही. आमची लढाई बबली सोबत नाही. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अशी आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता नवनीत राणांवर केली आहे. “तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे. बाई तुम्हाला प्रेमाने बोलावेल पण तुम्ही मोहाला बळी पडू नका. आपण सावध राहिलं पाहिजे. डोळा मारला की जायचं नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे”. ज्या बाईने मातोश्रीचा अवमान केला आणि मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला तिचा पराभव करणं हे आमचं प्रथम काम आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Supriya Sule : जोरदार शक्तिप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंनी भरला आपला उमेदवारी अर्ज

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!