Narayan Rane

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

507 0

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र भाजपकडून या जागेसाठी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे.

नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू. सध्या आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात असलेला वाद आता संपला आहे.

नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत होणार सामना
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News
error: Content is protected !!