Rohit Patil

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

406 0

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आज राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान होत आहे. यादरम्यान सांगलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, स्वर्गवासी आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. धक्कादायक म्हणजे याअगोदरदेखील रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक झाले होते.

रोहित पाटील यांचं फेसबुक पेज हॅक झाल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. रोहितचं फेसबुक पेज पूर्ववत व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

काय लिहिले ट्विटमध्ये?
माझे युवा सहकारी आणि स्व. आर. आर पाटील (आबा) यांचा वारसा चालवणारे रोहित पाटील यांचं face book पेज ऐन निवडणुकीच्या काळात दुसऱ्यांदा हॅक झालं. यावर पडणारा चुकीचा मजकूर आणि आक्षेपार्ह फोटो हटवून पेज रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असून या चुकीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करावं! असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!