uddhav thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

683 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं नसतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. एवढंच नव्हे, उरण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारही घोषित केला आहे.

कोणाला देण्यात आली उमेदवारी ?
मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी घोषित केली. तर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उरण मतदारसंघातून मनोहर भोईर यांचं नाव जाहीर केलं. शिवसेनेची उमेदवारी सर्वसाधारणपणे पक्षाचं मुखपत्र ‘सामना’तून जाहीर केली जाते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा करत असतानाच उमेदवारांची घोषणा केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!