पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, अद्यापही महाविकासआघाडी आणि महायुतीच्या जागांबाबतचा तिढा सुटलेला नाही. काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान सर्वात जास्त चर्चा रंगली होती कि शिरूर मतदार संघाची. कारण या ठिकाणी महायुतीमधील सगळ्याच पक्षांनी दावा केला होता. अखेर या जागेवर महायुतीचा उमेदवार ठरला आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांची अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात डाव टाकला आहे. शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे. या बाबतची घोषणा आज सकाळी दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत झाल्याचे समोर आले आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे, पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट बोलूनच दाखवलं. त्यामुळे हा मतदार संघ चर्चेत आला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत रंगताना दिसणार आहे. शिरूरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळराव पाटलांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?
Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण
Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या