विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून नुकसान ग्रस्त भागांची पाहणी; राज्य सरकारकडे ‘ही’ केली मागणी

198 0

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आणि लवकरात लवकर नुकसान ग्रस्त भागात मदत मिळावी अशी मागणी केली.

अजित पवार यांनी आज पाहणी केली असता त्यांनी या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला आहे. जर नवीन स्थापित झालेलं सरकार एका बाजूला बाळासाहेबांचं नाव घेतं मग औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला का स्थगिती देत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आज नुकसान ग्रस्त भागांची पाहणी केली आहे नुकसानीचे पंचनामे तातडीने झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्यात पुराचं संकट आहे आणि अजूनही सरकार अस्थित्वात नाही. अडीच वर्षांपूर्वीच राजकारण विसरून आता शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासकामे तसेच रोजगार या प्रश्नाला प्राधान्य द्यायला हवं, असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Share This News
error: Content is protected !!