#CHINCHWAD : भाजपकडून चिंचवड विधानसभा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी घेतले नामनिर्देश पत्र !
चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघाची भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का ? याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होतीच. दरम्यान लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोघांची नावं चर्चेत होती. अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
