Narendra Modi and Jayant Patil

Narendra Modi : शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलांनी ‘तो’ व्हिडिओ दाखवत दिले जोरदार प्रत्युत्तर

346 0

मुंबई : काल शिर्डीतील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.माजी कृषीमंत्री राहिलेल्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या पस्थितीत केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी केली. त्यांच्या या प्रश्नावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी राष्ट्र बळकटीचं काम करत आहेत. म्हणून विकासाचा हाच धागा पकडून आपण भाजपसोबत गेल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. शिर्डीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मोदींचं कौतूक केलं. मात्र, मोदींनी अजित पवारांसमोर काका शरद पवार यांना टोला लगावला.

यावर जयंत पाटील यांनी किती हा विरोधाभास, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी 60 वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं जयंत पाटील म्हणाले. याचा दाखला देताना त्यांनी मोदींच्या एका भाषणाचा व्हिडिओदेखील ट्विट केला आहे.

Share This News
error: Content is protected !!