https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2025/04/J-P-e1745764003963.png

JAYANT PATIL यांच्याकडे… ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष SUNIL TATKARE यांचं मोठं विधान

561 0

मुंबई : पोटातले पाणी हलू न देणे, ही जयंत पाटील (JAYANT PATIL) यांची खासियत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील काही वाचता येत नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत तटकरे यांना विचारले असता, ते म्हणाले की, जयंत पाटील आमच्या पक्षात येणार, हे कोणी सांगितले? १९९० पासून ते राजकारणात प्रबळपणे काम करतात. त्यांच्या मनातील फारसे कोणाला कधी कळले नाही. विधिमंडळात आमची सहज भेट झाली होती. दीर्घकाळ सोबत राजकीय प्रवास झाल्यामुळे आमची मैत्री आहे. ते नेहमीच अॅक्टीव्ह असतात. एक, दोनदा त्यांच्याशी चर्चा झाली पण, ती वेगळी कुठली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमची पुढची वाटचाल सुरू आहे. कुटुंब म्हणून मी भाष्य करणार नाही. मी फक्त राजकीय भूमिका मांडू शकतो. कौटुंबिक नाते कौटुंबिक असते. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ, हीच आमची राजकीय भूमिका आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, असे आम्ही माध्यमातून ऐकतोय. ते दोघे एकत्र येत असतील तर स्वागतच आहे. आदिशक्ती मुकताईच्या मनात नेमके काय आहे हे येणाऱ्या काळात कळेल, असेही तटकरे यांनी म्हटले.

AJIT PAWAR: ‘कितीही जवळचा असेल तरी मकोका लावणार’; अजित पवारांचा गुन्हेगारांना सज्जड दम

Maharashtra Politics : विधानसभा जागांवरून भाजप -राष्ट्रवादीत होणार राडा; छगन भुजबळ यांनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

LADKI BAHIN YOJANA: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार ? माजी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Asim Sarode : एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे FIR का? ॲड. असीम सरोदे यांचा सवाल

Marotrao Kannamwar : काँग्रेस कार्यालयाचं बाकडं ते थेट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची!

PUNE KOTHRUD CRIME NEWS: …अन् त्याने भर रस्त्यात केले आईच्या बॉयफ्रेंडवर सपासप वार

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

Share This News
error: Content is protected !!