मशिदीवरचे भोंगे बंद होत नसतील तर हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे

500 0

मी अयोध्येला जाणार आहे, पण तारीख अद्याप निश्चित झाली नाही. आपण जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत ? असा सवाल करत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हाक दिली आहे.

त्याचवेळी मशीदीवरील भोंग्याचाही विषय राज ठाकरे यांनी लावून धरला. मशीदीवरील भोंगे बंद होत नसतील तर त्याच्यापुढे हनुमान चालीसा लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी एकुणच राज्यातील राजकीय परिस्थिती, जातीचे राजकारण, मुंबई महापालिकेचा कारभार, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर सरकारच्या कारभारावर टीका केली. शिवतिर्थावर आयोजित गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते.

 

Share This News
error: Content is protected !!