पुणे- वाल्हेकरवाडी रस्त्यावर एका इमारतीचा काही भाग कोसळून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, वाल्हेकरवाडी रस्त्यावर एका इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू होते. त्याचवेळी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या ढिगाऱ्याखाली एका कामगाराचा दाबून मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने इतर कामगार जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालून या कामगाराला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान , ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.