मातंग समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन

938 0

पुणे : आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन झाले आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ते खंदे समर्थक होते. 20 दिवसांपूर्वी हृदयविकारचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पूना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मातंग समाजाच्या प्रश्नासाठी ते नेहमी अग्रेसर असत 30-35 वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत होते . आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते एमडी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीत सहभागी झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना हक्काचे घर देण्यामध्ये मोठे योगदान आहे.

त्यांच्या मागे मुलगा विरेन ,पत्नी सत्यभामा ,सून आणि नातवंडे असा परिवार आहे .दलीत चळवळीतील अतिशय संवेदशील असे व्यक्तिमत्व हरपले आहे .
उद्या सायंकाळी 3 वाजता धनकवडी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Share This News
error: Content is protected !!