राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. आंबेडकरी समाजासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
एक जुलै रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग वरून जो वाद निर्माण झाला होता त्यातून आंबेडकरी अनुयायांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्किंग वरून आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून त्यांनी आंदोलन उभे केले आहे. त्यामुळेच त्यांच्या भावनांचा आदर करत मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
नेमक्या मागण्या काय ?
1. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलकाला अटक केली जाणार नाही.
2. शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देणार.
3. अतिक्रमणातील घरे पाडली जाणार नाहीत आणि त्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल.
या तीन मागण्या मान्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मात्र ज्या अंडरग्राउंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायी विरोध करत आहेत. त्या पार्किंगचे बांधकाम मागे घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.