Rahul Gandhi : ” देशातील प्रत्येक यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणात “

281 0

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रपती भवन नावर मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी काळे कपडे घालून या मोर्चामध्ये सहभाग घेतला दरम्यान राष्ट्रपती भवन कडे जात असतानाच या मोर्चाला मध्ये थांबवण्यात आलं .

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन सुरू केलं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलनात सुरुवात केली होती यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते यावेळी पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यासह काँग्रेसच्या 64 खासदारांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे .

दरम्यान ” सरकार महागाई आणि बेरोजगारी घाबरत आहे. हे लोक जनतेच्या ताकतीला घाबरत आहेत . कारण सत्तेतील लोक खोटं बोलत आहेत. देशात बेरोजगारी ,महागाई नाही . देशात चीनची घुसखोरी झालेली नाही . असं हे लोक खोटं सांगत आहेत. मी महागाईवर बोलतो ,बेरोजगारीवर बोलतो ,सत्य बोलतो त्यामुळेच माझ्या पाठी काही एजन्सी लावण्यात आल्या असल्याच देखील राहुल गांधी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटला आहे .

त्यासह भारतातील प्रत्येक यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहे प्रत्येक संस्थेत संघाचा माणूस आहे . त्यामुळे आपण केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नसून ,भारताच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात लढत आहोत असे देखील यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!