अखेर सत्यजित तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन ! नाशिक मतदार संघातून ‘या’ उमेदवाराच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी मैदानात
लवकरच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान नाशिक मतदार संघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्यात आले असून आता नाशिक मधून शुभांगी पाटील या निवडणूक लढवणार आहेत. camila onlyfans
आज महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान पाचही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर मधून सुधाकर अडबाले, अमरावती मधून धीरज लिंगाडे ,औरंगाबाद मधून विक्रम काळे, नाशिक मधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचं आज जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपने भूमिका जाहीर करावी असे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हण्टलं आहे. तसेच सत्यजित तांबे यांचे काँग्रेस मधून निलंबन करण्यात आल्याचा देखील त्यांनी स्पष्ट केल आहे.
