एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश

480 0

मुंबई: राज्यातील सर्व पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले असतानाच राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत असून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

२०१९मध्ये प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता.

यावेळी राज्य शासनाने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत, मुलींना उच्च शिक्षण विनामूल्य देण्यासारखे निर्णय घेतले असून त्याने प्रभावित होऊन अनेकजण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, आमदार प्रा.मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे तसेच शिवसेना पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!