महत्वाची बातमी: “…तर एकनाथ शिंदे यांना द्यावा लागू शकतो मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा;शिंदे-फडणवीस सरकारसाठी उद्या महत्त्वाचा दिवस

326 0

मुंबई :11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस शिंदे-फडणवीस सरकारसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उद्या सुनावणीमध्ये जर 16 आमदारांचा निलंबन केलं तर 16 आमदारांना अपात्र करण्यात येऊ शकतं.परिणामी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. “आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.न्यायव्यवस्थेचे काम किती दबावाखाली चालू आहे हे आम्हाला माहिती आहे.परंतु देशाला हे समजेल की या देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.”असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
त्यामुळे उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.जर हा निर्णय बंडखोर आमदारांच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा राजकीय भूकंपासह मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!