घोडीवर मांड ठोकून डॉ. अमोल कोल्हे बैलगाडी शर्यतीत, दिलेला शब्द पाळला

339 0

पुणे- बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार डॉ. यांनी दिले होते. या आश्वासनाची आठवण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून देताच खासदार कोल्हे यांनी आज दावडी निमगावच्या यात्रेत भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये घोडीवर बसून आपला शब्द खरा करून दाखवला.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती उत्साहात पार पडल्या. त्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीचे करण्यात आले होते. यामध्ये एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन खासदार कोल्हे यांनी दिले होते.

कोल्हेंना त्यांच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. ‘खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे म्हटले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनीही रुबाबदार एंट्री मारत घोडी धरून आढळराव पाटलांनी दिलेलं आव्हान पूर्ण केले.

Share This News
error: Content is protected !!