मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये (Disha Salian Case) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये सरकारकडून एसआयटी स्थापन करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या एसआयटी चौकशीमध्ये आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी काम करणार आहे.
फडणवीसांनी दिले आदेश
दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी मागील काही काळापासून सातत्याने काही आमदारांकडून केली जात होती. याच मागणीची दखल घेत मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता लवकरच ही चौकशी करण्यात येणार आहे.
काय आहे नेमके दिशा सालियान प्रकरण?
दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग
Yuva Sangharsh Yatra : आजोबा शरद पवारांनंतर नातू रोहित पवारांनी पावसातून केली युवा संघर्ष यात्रा
RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द
Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर
Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस
Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या
Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या