DILIPKUMAR SANANDA JOIN NCP मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात काँग्रेसला घर-घर लागली असून अनेक जण पक्ष सोडून जाताना दिसत असून
अशातच आता आणखी एक मोठा नेता काँग्रेसचा हात सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
DILIPKUMAR SANANDA JOIN NCP | विलासरावांचं मुख्यमंत्रिपद पणाला लावणारा नेता अजित पवारांच्या गळाला
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते स्व. विलासराव देशमुख यांचे विश्वासू अशी ओळख असणारे दिलीप सानंदा काँग्रेसचा हात सोडून 12 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
1999,2004,2009 अशी सलग तीन टर्म खामगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014 मध्ये राज्याचे विद्यमान कामगार मंत्री आकाश पांडुरंग फुंडकर यांनी त्यांचा 7,061 मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत आकाश पांडुरंग फुंडकर यांना 71,819 तर दिलीप सानंदा यांना 64,758 इतकी मतं मिळाली होती.
Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन
या काळात सावकारीच्या एका प्रकरणामुळे दिलीप सानंदा (DILIPKUMAR SANANDA JOIN NCP) हे संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरले होते.
त्यावेळी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपांमुळे विलासराव देशमुख यांचं मुख्यमंत्रिपद पणाला लागलं आहे.
विदर्भात काँग्रेस वाढवण्यात दिलीप सानंदा यांचा मोठा वाटा होता. मागील साधारणतः वर्षभरापासून दिलीप सानंदा हे पक्ष सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या
मात्र आता अखेर 12 जून रोजी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.