DEVENDRA FADANVIS OATH 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा सर्वांनाच प्रश्न पडला होता या प्रश्नाचा अखेर उत्तर मिळाला असून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे 21 वे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून या अगोदर 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या केवळ 72 तासाच्या कालावधीसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती
मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारोहाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थित होते मोदी यांच्या सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा प्रमुख उपस्थित होते.
19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारोहाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हरियाणाचे मुख्यमंत्री नायक सिंग सैनी यांच्यासह भाजपाशासित 19 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांचे तीन ‘ओएसडी’ सक्रिय राजकारणात;दोन विधानसभेच्या आखाड्यात