महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाले असून. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राहिलेल्या सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभेतून उमेदवारी मिळाली असून सुमित वानखेडे यांच्या रूपानं देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक ओएसडी सक्रिय राजकारणात येणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून सुमित वानखेडे हे सक्रिय राजकारणात येतील अशा चर्चा सुरू होत्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्याकडे वर्धा लोकसभेची जबाबदारी देण्यात आल्यानंतर वानखेडे हे लोकसभा निवडणूक लढवतील असेही बोललं गेलं होतं. मात्र आता भाजपने तिसऱ्या यादीत विद्यमान आमदार दादाराव केचे यांचा पत्ता कट करून सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभेतून उमेदवारी दिली आहे. या अगोदर सुमित वानखेडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव म्हणून काम केलंय.
सुमित वानखेडे यांच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचे आणि खाजगी सचिव म्हणून काम केलेले नेमके कोण सक्रिय राजकारणात आलं?
श्रीकांत भारतीय: श्रीकांत भारतीय यांची भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून राबविण्यात आलेल्या महाविजय 2024 चे संयोजक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. सध्या श्रीकांत भारतीय हे विधान परिषदेचे आमदार आहेत.
अभिमन्यू पवार: अभिमन्यू पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलं आहे. औसा विधानसभेचे आमदार म्हणून कार्यरत होते. आता दुसऱ्यांदा अभिमन्यू पवार यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.
सुमित वानखेडे: देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून सुमित वानखेडे यांची ओळख आहे. वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी सुमित वानखेडे यांच्या खांद्यावर होती. आता विद्यमान आमदार दादाराव केचे यांचा पत्ता कट करत सुमित वानखेडे यांना उमेदवारी मिळाली आहे.