DEVENDRA FADNAVIS OFFER UDDHAV THACKERAY : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही... आता आजचंच बघा ना !

DEVENDRA FADNAVIS OFFERUDDHAV THACKERAY : तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप! देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर

98 0

DEVENDRA FADNAVIS OFFER UDDHAV THACKERAY : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही… आता आजचंच बघा ना !

बऱ्याच दिवसानंतर उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY ) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांची भेट झाली.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सभागृहातच ऑफर दिली. या दोघांमधला नेमका संवाद काय? पाहूयात…

VIDEO NEWS: तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (AMBADAS DANAVE) यांच्या आमदारकीचा आजचा शेवटचा दिवस…

याच निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. त्यापूर्वी दोन्ही नेत्यांची सभागृहाच्या बाहेरही भेट झाली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धवजी आता 2019 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे.

यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल आपण वेगळ्या पद्धतीने बोलू…”

आता भर सभागृहातच अशा पद्धतीचे ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एकीकडे पाच जुलै रोजी झालेल्या मनसेने शिवसेनेच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीच्या चर्चा जोरदार चालू असताना देवेंद्र फडणवीस यांचं

असं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता मुंबई महापालिकेवर राज्य करण्याचं प्रत्येक पक्षाचं स्वप्न आहे.

उद्धव ठाकरेंची त्यासाठी मोठी धडपड. आगामी निवडणुका पाहता राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीसाठी देखील ते आग्रही आहेत.

असं असताना देवेंद्र फडणवीसांच सभागृहातील वक्तव्य हे अनेक प्रश्न निर्माण करणारं आहे .

SHIVSENA UBT: भास्कर जाधव गटनेते, सुनील प्रभू प्रतोद तर आदित्य ठाकरेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहता कधी काय होईल याचा नेम नाही.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील नेत्यांची भेट चर्चेत आहे आणि दुसरीकडे ‘तुम्हला इकडे यायचा स्कोप आहे’

WHO IS SUDHAKAR BADGUJAR: संजय राऊतांचे राईट हॅन्ड ते ठाकरे गटातून हकालपट्टी;कोण आहेत सुधाकर बडगुजर?

असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना बोलले आहेत. काय असू शकेल यामागचं देवा भाऊंचं पडद्यामागचं राजकारण? हे आता येणारा काळच सांगेल…

WHO IS SHSHIKANT SHINDE: माथाडी नेता ते प्रदेशाध्यक्ष; कसा आहे शशिकांत शिंदेंचा राजकीय प्रवास

Share This News
error: Content is protected !!