आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संजय राऊत यांनी केलं ‘हे’ ट्विट

राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याआधी 24 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राजकीय मतभेद विसरून फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘काळजी घ्या. आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो! जय महाराष्ट्र!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.