Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला ;होणार ‘या’ विषयांवर चर्चा

292 0

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचं समजते आहे. दरम्यान राज्यसभा आणि विधान परिषदेतील निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी भाजपला मदत केली होती.                                                                                                                                                                                                       याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार असून,त्यासह त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस करण्यासाठी आजची भेट ठरवण्यात आल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणतीही अट न ठेवता भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी देवेंद्र फडणविस आज त्यांची भेट घेणार आहेत.
त्यासह महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसे एक साथ दिसणार का ? अशी देखील चर्चा या भेटीच्या अनुषंगाने व्यक्त केली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!