Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

396 0

पुणे : राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. रूपाली चाकणकरांनी 14 नोव्हेंबर रोजी फेसबुकवरुन बहुजनांचा राजा बळीराजाच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे, त्यानंतर यासंदर्भातील वादाला सुरुवात झाली होती. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

नेमकी काय आहे संभाजी ब्रिगेडची मागणी?
मुळात राज्यातला शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळी बलीप्रतिपदेच्या दिवशी शेतात बळीपूजन करतो. इतिहासात बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या गुलामगीरी या ग्रंथात सिद्ध केला. बळीराजाला इथला बहूजन पुर्वज मानतो, त्याच्या डोईवर आक्रमक वामनाने पाय ठेऊन पाताळात घालणारे काल्पनिक चित्र प्रसारीत करणे म्हणजे आपल्या पुर्वजांचा वारसा नाकारून वामनाचे उदात्तीकरण करणे होय, असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या या पोस्टमुळे मराठा, बहुजन व शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” अशा घोषणा देण्यात आल्या. संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रदिप कणसे, सहसंघटक अशोक काकडे, विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, प्राची दुधाणे, ज्योती गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर, उपाध्यक्ष वैभव शिंदे, हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत नरवडे, नागराज लावंड, गणेश कुंजीर, कैलास कणसे, राणाप्रेमजितसिंह पवार, प्रशांत तापकीर आणि शिवदास मोरे यावेळी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Related Post

…. त्या आजींच सत्कारचं केला पाहिजे; मनसे नेते संदीप देशपांडे यांचं खोचक ट्विट

Posted by - April 25, 2022 0
राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोरच हनुमान चालीसाचे…
Accsident

देवदर्शनहून परतणाऱ्या कुटुंबाचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

Posted by - May 16, 2023 0
पनवेल : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Highway) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये कोल्हापूर (Kolhapur) येथून…
Accident News

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - July 18, 2023 0
पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टॅंकरचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. उरुळी कांचनमधील एलाईट चौकामध्ये हा भीषण…
Raj Thackeray

Raj Thackeray : घडाळ्यानं काटा काढला कि काट्यानं घड्याळ? राज ठाकरेंची टीका

Posted by - July 4, 2023 0
पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit Pawar) 9…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *