DELHI RESULT | झाडू चालणार की कमळ फुलणार; दिल्ली विधानसभेचा आज निकाल

309 0

दिल्लीतील 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीत भाजप आणि आपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढलेली काँग्रेस आणि आप दिल्लीमध्ये वेगळे लढले, तर भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढली, त्यामुळे दिल्लीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली.

2015 ला 70 पैकी 67, तर 2020मध्ये 62 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही आपचा झाडू विरोधकांचा सुफडा साफ करणार की भाजपचं कमळ फुलणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणारे.मात्र, यंदाच्या निवडणुकीआधी आपच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह या आपच्या नेत्यांन तुरुंगात जावं लागलं.

 

Share This News
error: Content is protected !!