Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

350 0

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सहा वर्षांसाठी ही कारवाई असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे.

संजय निरुपम हे काँग्रेसच्या मुंबईतील आक्रमक नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जातात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. संजय निरुपम एकेकाळी शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी बरेच वर्ष काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केलं आहे. त्याची जाणीव काँग्रेस पक्षालाही होती. काँग्रेसच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीत ते होते. पण उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला होता.

Share This News
error: Content is protected !!