मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेसाठी मोर्चे बांधणी केली असून काही पक्ष हे राज्यातील महत्त्वाच्या दोन युती-आघाडीमध्ये सामील झालेत. दुसरीकडे अनेक वेळा प्रयत्न करूनही महाविकास आघाडीशी एकमत होत नसल्यामुळे वंचितनेही स्वबळावर लढण्याचा नारा दिला. मात्र या सगळ्यात काहीच दिवसांसाठी चर्चेत आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे हा पक्ष निवडणुकीतून गायब झाला आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसे स्वबळावर लढेल असे सर्वांनाच अपेक्षित होते. मनसेतर्फे प्रत्येक मतदारसंघात अनेक इच्छुकही होते. मात्र राज ठाकरेंनी याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केले नाही. त्यानंतर अचानक राज ठाकरेंनी दिल्लीचे दौरे केले. त्यांच्याबरोबर पुत्र अमित ठाकरेही होते. ठाकरे पिता पुत्राने अमित शहांची भेट घेतली आणि मनसे महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मनसेने महायुतीकडे दक्षिण मध्य मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीन जागांची मागणी केली. दक्षिण मध्य मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीतून राज ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील अशा चर्चाही सुरू होत्या. या सगळ्यावर मनसेतर्फे दोन दिवसात अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. मनसेतर्फे अधिकृतरित्या ते महायुतीत सहभागी झालेत याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. तर इतक्या दिवसांच्या कालावधीनंतर मनसेचा विचार बदलला आहे का? मनसे स्वबळावर लढणार का? की महायुती बरोबर जाणार? याबाबत कुठलीच स्पष्टता नाही.
एकीकडे महायुती, महाविकास आघाडीतील बऱ्याच जागांवरचे उमेदवार जाहीर झालेत. त्यांनी प्रचाराचा नारळ ही फोडला आहे. यात वंचित बहुजन आघाडी सुद्धा आता मागे राहिलेली नाही. मात्र या निवडणुकीच्या वाऱ्यांमधून मनसे कुठेतरी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज ठाकरे इतके शांत का आहेत? मनसे अचानक बॅक फुटवर का गेली आहे? हाच प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या दिवशी मेळावा घेणार आहेत आणि या मेळाव्यानंतर कदाचित मनसेची भूमिका स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Viral Video : मन सुन्न करणारं दृश्य ! मुलाने तोंड दाबलं अन् सुनेनं काठीने मारलं
Mahadev Jankar : महादेव जानकरांचा पुतण्या लोकसभेच्या रिंगणात; ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार निवडणूक
Hemant Patil : हेमंत पाटलांचा पत्ता कट करत हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर
Shirur Lok Sabha : शिरूर मतदार संघात होणार तिरंगी लढत!
Karan Pawar : चर्चेतील चेहरा : करण पवार
Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश
Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’,अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा
Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे
Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा
LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश
Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू