Congress MLA Arrested

Congress MLA Arrested : हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराला अटक

530 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या एका आमदाराला अटक (Congress MLA Arrested) केली आहे. आफताब उद्दीन मोल्ला असं अटक करण्यात आलेल्या आमदाराचं नाव आहे. ते काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी हिंदू समाजाबरोबरच हिंदू मंदिरांबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आफताब यांना 7 नोव्हेंबर रोजी गुवहाटी येथून अटक करण्यात आली. आमदार वाजेद अली चौधरी यांच्या निवासस्थानी असताना आफताब यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नेमके काय केले वादग्रस्त वक्तव्य?
गोलपारामधील सभेमध्ये काँग्रेसच्या या आमदाराने, “जिथे जिथे हिंदू असतात तिथं चुकीची काम होतात. मंदिरातील पुजारी बलात्कारी असतात,” असं धक्कादायक विधान केलं होतं. याचविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाने मागितले स्पष्टीकरण ?
काँग्रेस आमदाराविरोधात दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये कलम 295(a), 153A(1)(b)/505(2)IPC) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. आसाम काँग्रेसने या प्रकरणामध्ये आमदार आफताब यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. असं विधान नेमकं कोणत्या हेतूने आणि का करण्यात आलं याबद्दल पक्षाने आफताब यांना जाब विचारला असून लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!