eknath Shinde

2024 ला नरेंद्र मोदी सर्व रेकॉर्ड मोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

705 0

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या रत्नागिरीच्या (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामाचं कौतुक केले. यावेळी त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर बोलताना पुन्हा युतीचं सरकार येईल असा दावा केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
2019 ला मोदींच्या लाटेत विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून गेले. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडणून येणार आणि पुन्हा युतीचं सरकार सत्तेत येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

शासन आपल्या दारी या अभियानातून सगळ्यांना लाभ होणार आहे. याठिकाणी आलेले सगळे लाभार्थी आहेत. शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. चांगलं शासन असं त्यांच ध्येय होतं. तोच आदर्श समोर ठेवून राज्य सरकार काम करत आहे. आधीची अडीच वर्ष सोडली तर आता आम्ही कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य नागिकांसाठी निर्णय घेतले आहेत. सर्वमान्य लोकांच्याआयुष्यात बदल झाला पाहिजे, हाच अजेंडा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!