Solapur News

Sharad Pawar : ‘साहेब आम्हाला न्याय द्या’ शाळेच्या रस्त्यासाठी चिमुकल्यांनी शरद पवारांना दिले निवेदन

1128 0

सोलापूर : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेला जाण्यासाठी रस्ता करून मिळावा या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना निवेदन दिलं आहे. पोलीस विद्यार्थ्यांना शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नव्हते, तरीही शेवटी गाडीच्या मागे पळत जावून एका विद्यार्थ्याने पवारांच्या हातात निवेदन‌ दिलं. गुरुवारी शरद पवार माढा तालुक्यातील कापशी येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. यादरम्यान हा सगळा प्रकार घडला.

काय आहे नेमके प्रकरण?
माढा तालुक्यातील टाकळी गावातील‌ काळे वस्तीच्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून शाळेपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाहीये. आमदार, खासदार आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करुन देखील हा रस्ता काही केल्या तयार होत नाहीये. यामुळे चिमुकल्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे. ज्या शाळॆत हा धक्कादायक प्रकार घडला त्या शाळेला आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आले आहे.

तरीही शाळेच्या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. शेवटी शरद पवार येणार असल्याचे समजताच स्वतः विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.‘साहेब आम्हाला न्याय द्या, शाळेला रस्ता द्या’, असे फलक हातात घेवून विद्यार्थी रस्त्यावर उभे होते.यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन तुमचा प्रश्न मी शरद पवार यांच्यापर्यंत पोचवतो. शाळेसाठी रस्ता तयार केला जाईल असं आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!