सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट (Rajkot fort) किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला. त्यावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलं तापलं होतं. राज्य सरकारला मोठ्या रोषाला सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतर याच राजकोट किल्ल्यावर आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. मात्र यावेळी पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आलं आहे.
४ डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या 35 फुटी पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र ऑगस्ट महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर आता चार महिन्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा नवा पुतळा उभारण्याचं काम सुरू होणार आहे.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. गार्नेट इंटिरियर्स आणि राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या दोन कंपन्यांनी पुतळ्याच्या कामासाठी निविदा दाखल केली होती. मात्र इतर कंपन्यांच्या निविदेचा विचार आणि वाटाघाटी करून अखेर राम सुतार यांच्या कंपनीला 20. 95 कोटींमध्ये पुतळ्याच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीने याआधी गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं काम पाहिलं आहे.
कसा असेल नवा पुतळा ?
या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुतळ्याची एकूण उंची 60 फूट इतकी असणार आहे. 8 एम एम जाडीचा पुतळा असणार आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या खाली तीन मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा असणार आहे. हा पुतळा कास्य धातूपासून बनवला जाणार आहे. त्याचबरोबर हा पुतळा शंभर वर्ष टिकेल अशा पद्धतीने बनवण्यात यावा व त्याचं काम सहा महिन्यांमध्येच पूर्ण करावं अशी अट घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हीच कंपनी पुढील दहा वर्षा पुतळ्याचे देखभाल आणि दुरुस्ती देखील करणार आहे.
हे ही वाचा
BJP MINISTERS LIST : भाजपची मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर; ‘या’ नव्या चेहऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?
EDITORIAL: संपादकीय! काका-पुतण्या एक झाले तर कुणाचे काय गेले?
https://www.topnewsmarathi.com/politics/if-uncle-and-nephew-become-one-who-will-lose/
MINISTERS IN PUNE: पुणे जिल्ह्याला मिळणार तब्बल “इतकी” मंत्रिपदं; कुणाकुणाची नावं चर्चेत ? वाचा सविस्तर